देशातील गरिबी हटविणे सहज शक्य आहे
देशातील गरिबी हटविणे सहज शक्य आहे
देशातील गरिबीची कारणे ही बेरोजगारी, शालेय शिक्षणाचा अभाव, कर्तृत्वाचा अभाव किंवा देशात पैशांची टंचाई नाहीत. खरे कारण म्हणजे श्रमिकांच्या श्रमाला योग्य दाम न देणारी, अन्यायकारक व सदोष अर्थवितरण प्रणाली. याच मुळावर घाव घातला गेला पाहिजे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोख पैशांच्या स्वरूपातील सर्व आर्थिक व्यवहार पूर्णतः बंद झाले पाहिजेत. असे झाले तर प्रत्येकाचे उत्पन्न रेकॉर्डवर येईल आणि कुणाकडेही लपवाछपवीची संधी उरणार नाही.
आज देशातील जवळपास 40% संपत्ती केवळ 1% लोकांच्या हातात आहे. अनेकांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर बेनामी मालमत्ता आणि भ्रष्टाचारातून जमवलेली संपत्ती आहे. जर सर्व व्यवहार फक्त ऑनलाईन किंवा चेकच्या माध्यमातून झाले, तर प्रत्येकाची आर्थिक हालचाल सरकारला सहज कळू शकेल.
यासाठी ‘श्रमिक हक्क निधी’ या नावाने एक स्वतंत्र कर प्रणाली सुरू करावी. या माध्यमातून जमा झालेला पैसा थेट गोरगरीब श्रमिक व कष्टकऱ्यांच्या श्रमाला योग्य दाम देण्यासाठी वापरला गेला पाहिजे.
याच मार्गाने देशातील गरिबीचे मूळ नष्ट होईल आणि खरी समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित होईल.
– श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home