भारताची वास्तविक आर्थिक स्थिती – एक वास्तव
भारताची वास्तविक आर्थिक स्थिती – एक वास्तव लेखक: अरुण रामचंद्र पांगारकर प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ आज भारतातील सामाजिक-आर्थिक स्थिती पाहता, एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, इथे कष्ट करणारा माणूस उपाशी आहे आणि फसवणूक करणारा माणूस श्रीमंत आहे. कृषी, श्रम, लघु उद्योग, कुटुंब व्यवसाय अशा क्षेत्रात प्रत्यक्ष कष्ट करणारा माणूस खऱ्या अर्थाने देशाचे उत्पादन वाढवतो, परंतु त्यालाच आर्थिक फटका बसतो. त्याउलट, दलाली, वकीली, बिनकामाचे सल्ले देणे, जाहिरातबाजी, आणि केवळ टक्केवारीवर उभे राहिलेले व्यवसाय भरभराटीत आहेत. खरे देशसेवक आज हालअपेष्टांत आहेत, तर राजकारण, धर्मकारण आणि मीडिया क्षेत्रातील अनेक लोक ऐशोआरामात आहेत. ही स्थिती 'चोर भामटे तुपाशी, कष्टकरी उपाशी' या वाक्याची आठवण करून देते. १) कृषी क्षेत्र: शेतकऱ्याच्या कष्टामुळे अन्नधान्य उत्पादन होते. पण त्याच्या उत्पादनाची किंमत व्यापारी आणि दलाल ठरवतात. शेवटी, शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्येकडे वळतो. २) मजूर वर्ग: कारखाने, बांधकाम, शेती, वाहतूक, सफाईकाम, हातगाडीवाले, हमाल हे सगळे श्रमिक वर्ग देशासाठी मूल...