meta property="og:title" content="श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज" />

Sunday, 17 August 2025

शेतकरी, कष्टकरी: शापित सुतपुत्र

 

शेतकरी, कष्टकरी: शापित सुतपुत्र

  1. क्रिकेटपटू: एका षटकाराची किंमत – करोडो रुपये
  2. अभिनेता: एका अभिनयाची किंमत – करोडो रुपये
  3. पुढाऱ्यांचे पंचवार्षिक: किंमत – पुढील आठ पिढ्यांची सोय
  4. काळ्या धंद्यावाले व भ्रष्टाचारी: काहीही होवो… शेवटी दोन नंबर
  5. सरकारी अधिकारी: सेवा कशीही करा, मेवा मात्र रग्गड!
  6. शेतकरी व इतर कष्टकरी: कष्ट कितीही करा, परंतु फळ… दगडासमान!

कल्पना करा:
वरच्या पाच “पांडवांनी” काम थांबवले तर काय होईल? विशेष काही नाही; जास्तीत जास्त गैरसोय.
पण, खालचा सहावा दानवीर “कर्ण” जर म्हणाला, “मी काहीच करणार नाही,” तर काय होईल?
यांना भीक मागून देखील अन्न मिळणार नाही. आणि नोटांची किंमत फक्त “कागदाचे तुकडे” ठरेल.

अरे लोकशाही! वरचे पाच पांडव राजपुत्र असले तरी, खालचा सहावा कर्ण – शापित सुतपुत्र – समाजातील खरी शक्ती आहे.

अजब तुझे सरकार! अशा व्यवस्थेला जागा देणे चुकीचे आहे.

लेखक:-अरुण रामचंद्र पांगारकर,

प्रणेता,

गरीबी हटाव चळवळ 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home