meta property="og:title" content="श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज" />

Wednesday, 6 August 2025

प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्या, आणि प्रत्येकाकडून कर वसूल करा

 

 प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्या, आणि प्रत्येकाकडून कर वसूल करा

महत्वाची सूचना: हा लेख प्रामाणिक राष्ट्रसेवकांसाठी नाही. त्यांनी मनाला लावून घेऊ नये.

देश चालतो तो केवळ करदात्यांच्या भरलेल्या पैशांवर नाही, तर शेतकरी, कंत्राटी कामगार आणि इतर कष्टकऱ्यांच्या शोषणातूनही! हे जळजळीत वास्तव आपण विसरून चालणार नाही.

"कमी काम, जास्त दाम" – हा प्रकारदेखील एका प्रकारचा फुकटखाऊपणा आहे.

कर भरणे म्हणजे देशावर उपकार करणे नव्हे.
खरे उपकारकर्ते तर शेतकरी आणि श्रमिक वर्गच आहेत.
तेच अन्न उगमवतात, तेच इमारती उभारतात, तेच उत्पादन करतात – त्यांच्या कष्टावरच समाज आणि अर्थव्यवस्था उभी आहे. पण तरीही, त्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला दिला जात नाही.

शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, पण त्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही.
कंत्राटी कामगारांना १६-१६ तास गुरांप्रमाणे राबवले जाते, पण वेतन अत्यल्प असते. कुठलाही सामाजिक सुरक्षा कवच दिला जात नाही.
या कामगारांच्या कष्टावरच ठेकेदार, दलाल आणि मालक वर्ग श्रीमंत होतो आहे.

हे पाहता, करदात्यांनी स्वतःच्या प्रामाणिकतेचा अहंकार करताना एकदा स्वतःला विचारावे –
"मी देशासाठी प्रामाणिक सेवा करतो का?" आणि "माझ्या सेवेला योग्य मोबदला मिळतो का?"

जर मिळत नसेल, तर तुमचाही शोषणाचाच भाग आहे — आणि ते शोषण बंद व्हायला हवे.


✍️ अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता,
आदर्श अर्थवितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी हटाव चळवळ

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home