असे झाले तरच शेतकऱ्यांसाठी शेतीव्यवसाय फायद्याचा ठरेल!
असे झाले तरच शेतकऱ्यांसाठी शेतीव्यवसाय फायद्याचा ठरेल!
अन्न निर्मितीसाठी शेती पिकवण्यासाठी रात्रंदिवस राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर व्यापारी आणि दलाल श्रीमंत होत आहेत. मात्र शेतकरी गरीबच रहात आहेत. याचे कारण एकच ते म्हणजे शेतमालाला हमीभाव न मिळणे हे होय.
यावर उपाय एकच — तो म्हणजे शेतकरी आणि व्यापारी यांनी एकत्रित रित्या काम करणे. शेतकरी आणि व्यापारी या दोघांच्या कामात सुसूत्रता येणे आवश्यक आहे.
सध्याची परिस्थिती अशी आहे की व्यापारी शेतकऱ्यांकडून अल्प दरात शेतमाल खरेदी करतात आणि स्वतः मात्र तो चढ्या दराने विकतात. काही अपवादात्मक प्रसंगी शेतमालाची आवक कमी झाली तर शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळतो. पण हा झुगारीसारखा प्रकार आहे — ढाय लागली… तर लागली! हा बेभरवशाचा प्रकार योग्य नाही.
उपाययोजना:
- व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल ताब्यात घ्यावा.
- तो शेतमाल त्यांच्या व्यापारी भावात बाहेर विकावा.
- सदर शेतमाल विकल्यानंतर आलेल्या रकमेतून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि व्यापाऱ्यांचा दळणवळण व अन्य खर्च वजा करण्यात यावा.
- उरलेली रक्कम शेतकरी व व्यापारी यांची मेहनत व झालेला खर्च यांच्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी यांच्यात वितरित करण्यात यावी.
- बाजारभावाच्या अभ्यासानुसार व्यापाऱ्यांनी शेतमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अभिप्राय (फीडबॅक) द्यावा, जेणेकरून मागणी आणि पुरवठा यांचा मेळ साधला जाईल आणि अतिरिक्त आवक होणार नाही.
असे झाले तर नक्कीच शेतीव्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल, जो सध्या केवळ व्यापारी आणि दलाल यांच्यासाठीच फायद्याचा ठरत आहे.
– अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home