महापुरुष तू महान
- Get link
- X
- Other Apps
महापुरुष तू महान
✍️ अरुण रामचंद्र पांगारकर
महापुरुष तू महान मानव समतेचा पुजारी
शिल्पकार घटनेचा तू दीन दलितांचा कैवारी ॥ धृ ॥
मंदिर ते काळ्या रामाचे नव्हते दलिता खुले,
दीपला रामही तव तेजाने दर्शन त्याने दिले
तूच स्थापिली मानवतेची मूर्ती त्या मंदिरी ॥ १ ॥
महापुरुष तू महान मानव समतेचा पुजारी...
चाखवली चवदार तळ्याला चव तू खऱ्या धर्माची,
गढूळ धर्माला नीतळता आणली मानवतेची
तूच बुजवली धर्मामधली जातियतेची दरी ॥ २ ॥
महापुरुष तू महान मानव समतेचा पुजारी...
तूच तोडील्या गुलामगिरीच्या खळा खळा श्रुंखला,
अन् लाविली आग आंधळ्या दिव्य धर्म ग्रंथाला
राख करी जो मनुस्मृतीची तूच तो नरकेसरी ॥ ३ ॥
महापुरुष तू महान मानव समतेचा पुजारी...
ज्ञानसाधना तुझी अशी की तुच रे तुझिया सम,
प्रज्ञा, शील, करुणा यांचा तू त्रिवेणी संगम
तुझ्या लेखणीतून अवतरली समतेची पंढरी ॥ ४ ॥
महापुरुष तू महान मानव समतेचा पुजारी
शिल्पकार घटनेचा तू दीन दलितांचा कैवारी
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
✊ आपले विचार खाली नोंदवा. श्रमिकांच्या हक्कासाठी एक विधायक विचारही परिवर्तन घडवू शकतो. सभ्य आणि विचारशील प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
✊ अपने विचार नीचे दर्ज करें। श्रमिकों के अधिकारों के लिए आपका एक सकारात्मक विचार भी परिवर्तन ला सकता है। शालीन और रचनात्मक टिप्पणियों का स्वागत है।
✊ Share your thoughts below. Even a single constructive idea can bring change for workers’ rights. Respectful and meaningful comments are always welcome.