महानायका सुभाषचंद्रा, स्वातंत्र्यलढ्याच्या तेजस्वी इतिहासाचे काव्यरूप दर्शन

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz महानायका सुभाषचंद्रा | नेताजी सुभाषचंद्र बोस काव्यांजली

महानायका सुभाषचंद्रा!!

नेताजींच्या पवित्र चरणी हे काव्यसुमन!!!!

महानायका सुभाषचंद्रा देशाची तू शान!!
शब्दही पडती तुला अपुरे असे तुझे महिमान।।धृ।।

शूर सिंह तू वीर अलौकिक शौर्याची रे खाण,
तव कार्याला साक्ष आजही जर्मनी आणि जपान
नतमस्तक हा तुझिया चरणी सारा हिंदुस्थान।।१।।

तू तळपता सूर्य नभीचा, धगधगता अंगार,
चटक्यांनी तुझिया वितळले ब्रिटिशांचे सरकार
मुक्त कराया मातृभूमीला पेटवले तू रान।।२।।

सुटला कैदेमधून तू रे मौलवीच्या वेषात,
पेटाऱ्यातून जणू निसटले शिवरायच साक्षात
धन्य जाहली भारतमाता अजोड त्या करणीनं।।३।।

रावळपिंडीहूनी निघाला बनून झियाउद्दीन,
भगतराम तलवार जोडीला, झाला जो रहिमतखान
नामांतर, वेषांतर करुनी बनलाशी अफगाण।।४।।

अफगाणाहून जर्मनीस मग केलेस तू प्रयाण,
वावरला जर्मनीत ओरलँडो मॅझूटा बनून
राबवले रे तेथून नवक्रांतीचे अभियान।।५।।

जरी मिळवला हिटलरच्या तू हातामध्ये हात,
पेटवली त्या असंख्य हृदयी देशभक्तीची ज्योत
युद्धकैद्यांमध्ये फुंकला देशभक्तीचा प्राण।।६।।

जपानात जाऊन स्थापिली आझाद हिंद सेना,
लक्ष लक्ष हृदयात पेरली त्यागाची भावना
प्राणपणाने लढू लागले वीर अमर ते जवान।।७।।

घुमला नारा ‘चलो दिल्लीचा’ चढले स्फुरण वीरा,
तोडीत बेड्या करू लागले मुक्त आपुली धरा
हटू लागला मागे मागे ब्रिटिशरुपी हैवान।।८।।

सुरू जाहला पण नियतीचा खेळ नवा तो क्रूर,
जपान हरले महासंगरी अन् पालटला नुर
आग न विझली तव क्रांतीची, पसरे कणाकणानं।।९।।

तव स्फूर्तीने पेटून उठले इथले लक्ष जवान,
संप जाहले तीनही दलांचे, ब्रिटीश झुकवी मान
अन् उगवला अखेर भूवर स्वातंत्र्याचा दिन।।१०।।

धन्य, धन्य रे सुभाषबाबू, धन्य तुझी रे धन्य!!
जनक तूच रे स्वातंत्र्याचा, तुझे विरोधक शून्य!!!!

नेताजी सुभाषचंद्र बोस की जय!!

महानायक सुभाषचंद्र बोस यांना कोटी कोटी प्रणाम!!

Comments

Popular posts from this blog

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

लोकशाहीचे अपयश की नागरिकांची उदासीनता?