Posts

Showing posts from May, 2026

🚫 भ्रष्टाचार पर लगाम यही हमारा ध्येय है!

Image
🚫 भ्रष्टाचार पर लगाम यही हमारा ध्येय है! "जनता का पैसा जनता के विकास के लिए होना चाहिए, न कि किसी के निजी लाभ के लिए।" सरकार द्वारा विकास कार्यों के लिए जो धन उपलब्ध कराया जाता है, वह जनता के करों से एकत्रित होता है। इसलिए उस धन का प्रत्येक रुपया जनता के कल्याण के लिए खर्च होना चाहिए। दुर्भाग्य से अनेक स्थानों पर विकास कार्यों के नाम पर गुणवत्ता की कमी, अपारदर्शिता, अनावश्यक खर्च और जनहित की उपेक्षा देखने को मिलती है। इसका सबसे बड़ा नुकसान आम नागरिकों को उठाना पड़ता है। ⚠️ वास्तविक समस्या क्या है? कागज़ों पर विकास, ज़मीन पर समस्याएँ। धन खर्च होता है, लेकिन सुविधाएँ नहीं पहुँचतीं। कार्य स्वीकृत होते हैं, लेकिन गुणवत्ता नहीं रहती। निर्णय जनता से दूर रखे जाते हैं। खर्च का पूरा हिसाब सार्वजनिक नहीं होता। 🎯 हमारी प्रतिबद्धता जनता का पैसा केवल जनता के विकास के लिए! हर विकास कार्य की गुणवत्ता की जाँच होनी चाहिए। हर खर्च का हिसाब जनता के सामने होना चाहिए। हर योजना की जानकारी सार्वजनिक होनी चाहिए। सत्ता कमाई का साधन नहीं, बल्कि जनत...

कागदोपत्री सिद्ध होणारा भ्रष्टाचार : केंद्र सरकारकडे मोठी मागणी

Image
कागदोपत्री सिद्ध होणारा भ्रष्टाचार : केंद्र सरकारकडे मोठी मागणी “केवळ लाच नव्हे, तर बेकायदेशीर आणि कायद्याविरुद्ध केलेले प्रशासकीय कामही भ्रष्टाचार मानले जावे” देशामध्ये भ्रष्टाचार हा सर्वसामान्य जनतेसमोर उभा असलेला सर्वात मोठा प्रश्न बनलेला आहे. परंतु आजही भ्रष्टाचाराची व्याख्या मुख्यतः “लाच घेणे किंवा देणे” यापुरतीच मर्यादित ठेवली गेली आहे. याच मर्यादित व्याख्येचा फायदा घेत अनेक बेकायदेशीर आणि अन्यायकारक प्रशासकीय कृत्ये शिक्षा टाळत असल्याचा गंभीर प्रश्न आता पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराची व्यापक व्याख्या करण्याची आणि “कागदोपत्री सिद्ध होणारा भ्रष्टाचार” ही स्वतंत्र कायदेशीर संकल्पना तयार करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे. मुख्य मागणी : जर एखाद्या अधिकाऱ्याने जाणूनबुजून कायद्याविरुद्ध, नियमबाह्य किंवा चुकीचा निर्णय दिला असेल आणि तो दस्तऐवजांच्या आधारे स्पष्टपणे सिद्ध होत असेल, तर तो देखील भ्रष्टाचार मानला जावा. भ्रष्टाचार सिद्ध करणे इतके कठीण का? प्रत्यक्ष आर्थिक देवाण-घेवाण बहुतांश वेळा गुप्तपणे केली जाते. दलालांमार्फत निर्जन ठिका...

गरीबी निर्मूलनाचा खरा मार्ग : डिजिटल अर्थव्यवस्था आणि श्रमिक हक्क

Image
गरीबी निर्मूलनाचा खरा मार्ग : डिजिटल अर्थव्यवस्था आणि श्रमिक हक्क “समस्या आहेत म्हणून प्रयत्न थांबवू नयेत. समस्यांवरील उपाय शोधत पुढे चालणे हेच खरे राष्ट्रनिर्माण आहे.” आज देशात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. गरीब अधिक गरीब होत आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. सरकारे बदलतात, योजना बदलतात, घोषणा बदलतात; पण सामान्य श्रमिकाच्या जीवनात अपेक्षित बदल घडताना दिसत नाही. गरीबीचे खरे कारण बेरोजगारी नसून सदोष अर्थवितरण व्यवस्था आहे. या देशात प्रत्येकाच्या हाताला काही ना काही काम आहे; मात्र प्रत्येक कामाला योग्य दाम नाही. याच अन्यायातून गरीबी निर्माण होते. फुकट योजना नव्हे, श्रमिक हक्क हवा! आज विविध “फुकट योजना” राबवल्या जात आहेत. मोफत धान्य, मोफत सुविधा, अनुदाने — यामुळे तात्पुरता दिलासा मिळू शकतो; पण कायमस्वरूपी गरीबी निर्मूलन होत नाही. उलट, समाजात अवलंबित्व वाढण्याचा धोका निर्माण होतो. गरीबाला दान नको — त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला हवा! घोषवाक्य : “हर हाथ को काम, हर काम को उचित दाम और सम्मान!” डिजिटल अर्थव्यवस्था का आवश्यक आहे? रोख व...

Is Corruption Limited Only to Bribery?

Image
Is Corruption Limited Only to Bribery? Why “Document-Proven Illegal Administrative Actions” Should Also Be Treated as Corruption Corruption has become one of the most serious problems in the country. However, even today, the definition of corruption is largely restricted only to financial transactions such as giving or accepting bribes. In reality, corruption is far broader and more dangerous than mere monetary exchange. In many government departments, especially revenue administration, local authorities, and quasi-judicial systems, complaints regarding illegal, unfair, and arbitrary decisions are increasing rapidly. In many cases, such decisions are issued without clearly mentioning the legal provisions or rules on which they are based. An Important Question: If an officer knowingly delivers an illegal or unjust decision, should it not also be considered corruption? Why Is Corruption Difficult to Prove? Financial transactions related to bribery are usually cond...

केवळ लाच म्हणजेच भ्रष्टाचार का?

Image
केवळ लाच म्हणजेच भ्रष्टाचार का? “कागदोपत्री सिद्ध होणारा भ्रष्टाचार” कायद्यात समाविष्ट करण्याची गरज देशामध्ये भ्रष्टाचार ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. परंतु आजही भ्रष्टाचाराची व्याख्या मुख्यतः केवळ आर्थिक देवाण-घेवाणीपुरती मर्यादित ठेवली गेली आहे. म्हणजेच लाच देणे किंवा घेणे हेच भ्रष्टाचाराचे प्रमुख स्वरूप मानले जाते. पण प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना भेडसावणारा भ्रष्टाचार यापेक्षा कितीतरी व्यापक आणि धोकादायक स्वरूपाचा आहे. आज अनेक शासकीय कार्यालयांमध्ये, विशेषतः महसूल विभाग, स्थानिक प्रशासन आणि विविध न्यायनिवाडा करणाऱ्या यंत्रणांमध्ये चुकीचे, नियमबाह्य आणि अन्यायकारक निर्णय दिले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अनेक वेळा हे निर्णय कोणत्या कायद्याच्या आधारे दिले गेले याचाही स्पष्ट उल्लेख नसतो. महत्त्वाचा प्रश्न : जर एखादा अधिकारी जाणूनबुजून चुकीचा किंवा कायद्याविरुद्ध निर्णय देत असेल, तर तो भ्रष्टाचार मानला जाऊ नये का? भ्रष्टाचार सिद्ध करणे इतके कठीण का? आर्थिक व्यवहार बहुतांश वेळा गुप्तपणे केले जातात. दलालांमार्फत निर्जन ठिकाणी व्यव...
Image
संघर्षातून घडलेली ओळख श्रमिक क्रांती मिशन – गरिबांचा आवाज “कष्ट करणारा माणूस कायम संघर्षातच का जगतो?” समाजातील आर्थिक विषमता, गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि श्रमिकांवरील अन्याय पाहताना मनात निर्माण झालेल्या प्रश्नातून या चळवळीची सुरुवात झाली. ही केवळ संघटना नाही, तर सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष आहे. १. आर्थिक विषमता विरोधी चळवळ समाजातील श्रीमंत आणि गरीब यांच्यात वाढत चाललेली दरी, एका बाजूला अफाट संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला उपासमार, ही व्यवस्थेतील गंभीर विषमता असल्याची जाणीव झाली. यातून जन्म झाला — “आर्थिक विषमता विरोधी चळवळ” या विचाराचा. २. आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ समस्या फक्त गरिबीची नसून, संपत्ती आणि संसाधनांच्या अन्यायकारक वितरणाची आहे, हा विचार अधिक स्पष्ट झाला. प्रत्येकाला काम, न्याय्य मोबदला, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, या उद्देशाने चळवळीला नवे स्वरूप मिळाले. ३. गरिबी हटाव चळवळ यानंतर चळवळीने थेट सामान्य माणसाच्या वेदनेला शब्द दिला. गरीब, शेतकरी, श्रमिक, बेरोजगार युवक आणि वंचित समाज यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्...

रस्ता खुला झाला… पण न्याय अजूनही बंदच!

Image
रस्ता खुला झाला… पण न्याय अजूनही बंदच! वहिवाटी शेतरस्त्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे वास्तव ग्रामीण भागातील हजारो शेतकरी आजही त्यांच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. ज्या देशात शेतकऱ्याला “अन्नदाता” म्हटले जाते, त्याच शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी प्रशासनाच्या दारात विनवण्या कराव्या लागतात, निवेदने द्यावी लागतात आणि अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. अनेक वेळा प्रशासनाकडून “रस्ता खुला” केल्याची कारवाई दाखवली जाते. परंतु प्रत्यक्षात पाहिले असता अनेक गंभीर त्रुटी दिसून येतात. भूमी अभिलेख विभागाकडून अधिकृत मोजणी केली जात नाही. रस्त्याची कायदेशीर रुंदी निश्चित केली जात नाही. सीमारेषा आणि कायमस्वरूपी हद्दखूण निश्चित केल्या जात नाहीत. पंचनाम्यात महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख टाळला जातो. फक्त वरवरची कारवाई करून प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारची अपूर्ण कार्यवाही भविष्यात पुन्हा वाद निर्माण करते. आज रस्ता खुला केला, पण उद्या पुन्हा अतिक्रमण झाले तर जबाबदार कोण? पंचनामा की औपचारिकता? अनेक...

रस्ता ‘खुला’ केला… पण शेतीची वाहने अजूनही बंदिस्त

Image
रस्ता ‘खुला’ केला… पण शेतीची वाहने अजूनही बंदिस्त वहिवाटी रस्ता प्रकरणात प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात आमरण उपोषणाचा इशारा सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथील वहिवाटी रस्ता प्रकरणात प्रशासनाकडून होत असलेल्या दीर्घकालीन दिरंगाईमुळे संबंधित शेतकऱ्यांना अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे. रिविजन केस नंबर 256 / 2023 मध्ये माननीय उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी अर्जदारांच्या बाजूने निकाल देत रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजतागायत सदर रस्ता पूर्णपणे वापरण्यायोग्य करण्यात आलेला नाही. वरिष्ठ स्तरावरून वारंवार निर्देश देण्यात आले असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. प्रकरणाची पार्श्वभूमी प्रतिवादींकडून रस्त्याचा कथित खोटा नकाशा सादर केल्याचा आरोप. पोलीस प्रशासन व महसूल विभागाकडे अनेक तक्रारी करूनही कारवाईचा अभाव. तत्कालीन तहसीलदारांनी दिलेला निकाल अन्यायकारक असल्याचे उच्च स्तरावर नमूद. अपील प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं...

गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन

Image
  गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन आजच्या समाजात एक विचित्र आणि वेदनादायक चित्र दिसते. गरीब माणसाला सरकारकडून काही किलो मोफत धान्य मिळाले, एखादी शिष्यवृत्ती मिळाली किंवा एखादी योजना मिळाली की लगेच काही लोक त्याला “फुकटखाऊ” म्हणू लागतात. पण दुसऱ्या बाजूला जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे, लाखो रुपयांचा पगार घेऊनही लाचखोरी करणारे अधिकारी आणि विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींचे कमिशन लाटणारे भ्रष्ट पुढारी यांच्याबद्दल मात्र समाजात तितक्याच तीव्रतेने चर्चा होताना दिसत नाही. गरीबांच्या ताटावर चर्चा होते; पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मात्र मौन पाळले जाते. हीच आपल्या व्यवस्थेची आणि सामाजिक मानसिकतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. गरीब मदत घेतो, कारण परिस्थिती त्याला भाग पाडते एखादा शेतकरी दुष्काळामुळे उद्ध्वस्त होतो. एखादा मजूर रोजंदारी नसल्यामुळे उपाशी झोपतो. एखादी विधवा महिला, वृद्ध व्यक्ती किंवा बेरोजगार युवक शासनाच्या योजनेचा आधार घेतो. हे लोक मदत घेतात कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांना मोफत धान्य, शिष्यवृत्ती किंवा अनुदान ही चैनीची...

आर्थिक विषमता विरोधी चळवळ: श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

Image
  आर्थिक विषमता विरोधी चळवळ श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज “जग जगतंय ते धनिकांनी कमावलेल्या धनावर नाही, तर श्रमिकांनी निर्मिलेल्या अन्नावर!!” आणि म्हणून श्रमिकांच्या कामाला योग्य दाम मिळायलाच पाहिजे. प्रस्तावना आज जग झपाट्याने प्रगती करत आहे असे सांगितले जाते. मोठमोठे उद्योग, उंच इमारती आणि अब्जावधींची संपत्ती निर्माण होत आहे.  एका बाजूला संपत्तीचे साम्राज्य उभे राहत असताना, दुसऱ्या बाजूला श्रमिक, शेतकरी आणि कष्टकरी  मात्र गरिबीत खितपत पडून जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. जो माणूस स्वतःच्या घामाने अन्न निर्माण करतो, रस्ते बांधतो, घरे उभी करतो, कारखाने चालवतो — त्यालाच दोन वेळच्या अन्नासाठी झगडावे लागते, ही समाजव्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. गरीबी हा व्यक्तीचा नव्हे, तर अन्यायकारक व्यवस्थेचा  दोष “जर एखादा मनुष्य दिवस-रात्र मेहनत करूनही आयुष्यभर गरीबच राहत असेल, तर तो दोष त्या व्यक्तीचा  नसून अन्यायकारक व्यवस्थेचा आहे.” समाजात अनेकदा गरीब माणसालाच त्याच्या परिस्थितीसाठी दोष दिला जातो. पण वास्तव वे...

Access Roads in Agriculture: A Complex Problem

Image
  Access Roads in Agriculture: A Complex Problem Agriculture in rural areas is not just a profession but a foundation of life. However, a serious and growing issue that is striking at the root of farming is the dispute over access roads (vahivati raste) . In many places today, some farmers, driven by greed to acquire more land, are blocking the traditional access roads of neighboring farmers. Farming Without Roads – A Harsh Reality Farming requires the movement of tractors, bullock carts, harvesters, pickups, and other machinery to reach the fields. But without proper access roads, farming becomes nearly impossible. In such situations, affected farmers approach the revenue department seeking justice. Role of Administration – Doubt and Disappointment Incorrect or misleading records are issued by the land records department. Decisions at the Tehsildar or Sub-Divisional Officer level often do no...

वहिवाटी रस्ते : जटिल समस्या

Image
वहिवाटी रस्ते : जटिल समस्या ग्रामीण भागातील शेती हा केवळ व्यवसाय नसून जीवनाचा आधार आहे. मात्र, या शेतीच्या मुळावर घाव घालणारी एक गंभीर आणि वाढती समस्या म्हणजे वहिवाटी रस्त्यांचा वाद . आजकाल अनेक ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून जास्त जमीन मिळवण्याच्या हव्यासापोटी शेजाऱ्यांचे वहिवाटी रस्ते अडवण्याचे प्रकार वाढत आहेत. रस्ता नसलेली शेती – एक विदारक वास्तव शेती करायची म्हणजे ट्रॅक्टर, बैलगाडी, हार्वेस्टर, पिकअप यांसारखी साधने शेतात पोहोचली पाहिजेत. पण जर रस्ताच नसेल, तर शेती करणे अशक्य होते. अशा वेळी पीडित शेतकरी न्यायासाठी महसूल विभागाचे दरवाजे ठोठावतात. प्रशासनाची भूमिका – संशय आणि निराशा भूमी अभिलेख विभागातून चुकीचे किंवा दिशाभूल करणारे दाखले दिले जातात. तहसीलदार किंवा प्रांताधिकारी स्तरावर कायद्याला धरून नसलेले निर्णय दिले जातात. काही प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवली जातात. शेतकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला हे सिद्ध करणे अवघड असले तरी उपलब्ध कागदपत्रांवरून निर्णय ...