लोकतंत्र की विफलता या नागरिकों की उदासीनता?

Image
  ✊ श्रमिक क्रांति – गरीबों की आवाज ✊ लोकतंत्र की विफलता या नागरिकों की उदासीनता? "मैं और मेरा परिवार" से "मेरा समाज, मेरा देश" तक... भारत को स्वतंत्र हुए कई दशक बीत चुके हैं। हम स्वयं को विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र कहने पर गर्व करते हैं। चुनाव होते हैं, सरकारें बदलती हैं, नई योजनाएँ घोषित होती हैं। फिर भी एक प्रश्न बार-बार सामने आता है— आम नागरिकों की अनेक मूलभूत समस्याएँ वर्षों से जस की तस क्यों बनी हुई हैं? इसका उत्तर केवल सरकार, प्रशासन या राजनेताओं में ढूँढना पर्याप्त नहीं है। शायद अब समय आ गया है कि हम स्वयं का भी आत्ममंथन करें। विचार करने योग्य प्रश्न आज समाज का एक बड़ा वर्ग "मैं और मेरा परिवार" की सीमित सोच तक सिमट गया है। जब व्यक्तिगत समस्याएँ हल हो जाती हैं, तब समाज में हो रहे अन्याय, भ्रष्टाचार, गरीबी, बेरोजगारी और सार्वजनिक समस्या...

आर्थिक विषमता विरोधी चळवळ: श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

Shramik Kranti – Garibon Ka Aawaz

 

आर्थिक विषमता विरोधी चळवळ

श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

“जग जगतंय ते धनिकांनी कमावलेल्या धनावर नाही,
तर श्रमिकांनी निर्मिलेल्या अन्नावर!!”

आणि म्हणून श्रमिकांच्या कामाला योग्य दाम मिळायलाच पाहिजे.

प्रस्तावना

आज जग झपाट्याने प्रगती करत आहे असे सांगितले जाते. मोठमोठे उद्योग, उंच इमारती आणि अब्जावधींची संपत्ती निर्माण होत आहे.  एका बाजूला संपत्तीचे साम्राज्य उभे राहत असताना, दुसऱ्या बाजूला श्रमिक, शेतकरी आणि कष्टकरी  मात्र गरिबीत खितपत पडून जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.

जो माणूस स्वतःच्या घामाने अन्न निर्माण करतो, रस्ते बांधतो, घरे उभी करतो, कारखाने चालवतो — त्यालाच दोन वेळच्या अन्नासाठी झगडावे लागते, ही समाजव्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

गरीबी हा व्यक्तीचा नव्हे, तर अन्यायकारक व्यवस्थेचा  दोष

“जर एखादा मनुष्य दिवस-रात्र मेहनत करूनही आयुष्यभर गरीबच राहत असेल, तर तो दोष त्या व्यक्तीचा  नसून अन्यायकारक व्यवस्थेचा आहे.”

समाजात अनेकदा गरीब माणसालाच त्याच्या परिस्थितीसाठी दोष दिला जातो. पण वास्तव वेगळे आहे.

  • शेतकरी उन्हात जळतो
  • कामगार दिवसभर मजुरी करतो
  • श्रमिक रात्रंदिवस कष्ट करतो

तरीही जर त्याला सन्मानाने जीवन जगता येत नसेल, तर प्रश्न त्या व्यक्तीच्या मेहनतीचा नाही; प्रश्न व्यवस्थेचा आहे.

आर्थिक विषमता म्हणजे काय?

जेव्हा काही लोकांकडे अमर्याद संपत्ती जमा होते आणि दुसऱ्या बाजूला करोडो लोक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करतात, तेव्हा त्याला आर्थिक विषमता म्हणतात.

  • श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत
  • गरीब अधिक गरीब होत आहेत
  • श्रमिकांचे श्रम स्वस्त झाले आहेत
  • रोजगार आणि शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे

चळवळीची उद्दिष्टे

  • श्रमिकांना योग्य दाम
  • गरीबांच्या आवाजाला व्यासपीठ
  • प्रत्येक हाताला काम
  • सामाजिक न्यायासाठी संघर्ष
  • आर्थिक विषमतेविरुद्ध जनजागृती

राष्ट्रव्यापी चळवळीची गरज

आर्थिक विषमता ही फक्त गरीबांची समस्या नाही, तर संपूर्ण राष्ट्राच्या भवितव्याची समस्या आहे.

जोपर्यंत श्रमिकांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत गरीब सन्मानाने जगत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील.

कष्टाचा सन्मान • श्रमिकांना न्याय • आर्थिक विषमतेविरुद्ध संघर्ष

श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज

✍️ अरुण रामचंद्र पांगारकर

Comments

Popular posts from this blog

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

लोकशाहीचे अपयश की नागरिकांची उदासीनता?